सविस्तर वृत्त असे की, डाक विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू केली. भारत सरकार नियंत्रित असलेल्या डाक विभागाद्वारे सुरू केलेल्या या बँकेवर नागरिकांनी विश्वास ठेवत आपले बँक खाते पोस्टात उघडले. खाते उघडणाऱ्यामध्ये वृद्ध पेन्शनधारक, विधवा महिला, अपंग पेन्शन धारक, महिला बचत गट यांचा अधिकाधिक समावेश आहे. या लोकांची पेन्शन पोस्टातील खात्यात जमा होते. पण वारंवार पोस्ट ऑफिसच्या चकरा मारूनही वृद्ध नागरिक महिलांना त्यांच्या खात्यातील रकमा भेटत नाहीत. जेव्हा चौकशी करावी तेंव्हा सर्व्हर डाऊन असल्याची उत्तरे दिली जातात. महिन्यातून सर्व्हर किती दिवस चालू असतो हाच केवळ आता संशोधनाचा विषय राहिला असल्यामुळे सर्व पेंशनधारक पोस्टातील खाती बंद करण्याच्या तयारीत आहेत. स्वतः चे पैसे असूनही वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना झक मारली आणि पोस्टात खाते काढले असे म्हणत पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.



0 Comments