Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

इचलकरंजीच्या शिवकुमार मुरतले यांना आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्रदान

इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा।

श्री मुरतले शिवकुमार इराण्णा यांना  राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार - 2024 महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ यांच्यावतीने 42 व्या कलाशिक्षण परिषद दिनांक 19 व 20 जानेवारी 2024 रोजी बोर्डी, ता. डहाणू ,जि. पालघर. या ठिकाणी संपन्न झाला त्यामध्ये आंतरभारती विद्यालय, इचलकरंजी चे कलाध्यापक श्री. शिवकुमार इराण्णा मुरतले यांना केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार 2024.  जगप्रसिद्ध शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांच्या शुभहस्ते व शिक्षक आमदार म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळेला राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कलाशिक्षक उपस्थित होते. शिवकुमार मुरतले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने व विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...