जयसिंगपूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
आष्टा येथील प्रियंका भानुसे यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी तर कोल्हापूर जिल्हा संघटक पदी श्रुती शिंगाई यांची निवड पश्चिम महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुनिता पवार यांनी केली.
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविभाऊ गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष सुनीता पवार व पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस गीता पाखरे यांनी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील प्रियंका भानुसे यांची निवड सांगली जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी केली. तर कोल्हापूर जिल्हा संघटक पदी श्रुती शिंगाई यांची निवड करण्यात आली
यावेळी प्रविण सासणे, गणेश पाखरे, सर्जेराव भानुसे आदीसह लोक जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा सुनीता पवार ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस गीता पाखरे यांनी केले



0 Comments