घोसरवाड /गीता संघर्ष वृत्तसेवा।
![]() |
| व्यासपीठावर बोलताना उद्यानपंडित गणपतराव पाटील |
पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा याबरोबरच समाज उपयोगी सुरू असलेल्या अनेक सामाजिक कार्यांना प्रसिद्ध देण्याचे काम लेखणी द्वारे करून त्यांना समाजातील दानशूर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व अशा समाज उपयोगी कार्यांना मदत मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे. असे उद्यान पंडित, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले
![]() |
| आदर्श पत्रकार पुरस्कार स्वीकारताना रमेश मिठारे |
ते जानकी वृद्धाश्रम व जानकी फाउंडेशन मार्फत पत्रकार सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जानकी वृद्धाश्रमाला सर्व मदत करू असे आश्वासनही दिले.
यावेळी वृद्धाश्रमच्या अध्यक्षा माणिक नागावे, डॉ.राजीव जाधव, महेंद्र बागे, राजकुमार बदलवा यांची प्रमुख उपस्थित होते.
![]() |
| पत्रकार गणपती कोळी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित |
यावेळी वृद्धाश्रमच्या अध्यक्षा माणिक नागावे, डॉ.राजीव जाधव, महेंद्र बागे, राजकुमार बदलवा यांची प्रमुख उपस्थित होते.
![]() |
| जानकी वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. बाबासाहेब पुजारी व सौ. पूर्वा पुजारी यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला |
जानकी वृद्धाश्रम घोसरवाड ता शिरोळ यांच्यामार्फत परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
![]() |
| पत्रकार दगडू माने आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित |
यावेळी जयसिंगपूरचे उद्योगपती राजकुमार बलदवा यांना समाजभूषण पुरस्कार,तर पत्रकार दगडू माने( दै पुण्यनगरी), गणपती कोळी ( दै लोकमत) , रमेशकुमार मिठारे (दै.लोकनेता),तात्यासो कदम (दै. महासत्ता) ,संतोषकुमार कामत( दै.पुढारी), मिलिंद देशपांडे( दै.लोकमत) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर यावेळी परिसरातील चाळीस पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
![]() |
| पत्रकार मिलिंद देशपांडे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित |
यावेळी डॉ. राजीव जाधव , राजकुमार बलदवा, माणिक नागावे,दगडू माने, दिलीप शिरढोणे, गणेश पाखरे, रमेशकुमार मिठारे, मिलिंद देशपांडे ,गणपती कोळी यांनी मनोगत व्यक्त केली.
![]() |
| पत्रकार गणेश पाखरे यांचा पत्रकार दिनानिमित्त पुष्प देऊन सन्मान |
प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब पुजारी यांनी केले तर आभार पूर्वा पुजारी यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा देशपांडे यांनी केले.









0 Comments