नेवासा/ वृत्तसंस्था।
नेवासामध्ये राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा तरुणांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून नेवासा येथेही पाच दिवसांपासून आमरण,साखळी उपोषण सुरू आहे. नेवासा शहर बुधवारी पूर्ण बंद ठेवत आंदोलनाल पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी नेवासा शहरात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ही प्रेतयात्रा काढत या चारही नेत्यांचा निषेध करत बोंबा बोब करत यावेळी मराठा समाजाच्या वतीने खोलेश्वर गणपती चौकात तिरडीचे दहन केले गेले.



0 Comments