कोल्हापूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा। 
करवीर तालुक्यातील बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील बंदूकीने अंधाधुंद गोळीबार करणारा एका दरोडेखोरास जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथून त्याला जेरबंद केले आहे. अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय 23 रा. पुठ रोड जि. मुरैना, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याक्याचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 16 लाख 22 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जून 2023 मध्ये बलिंगा (ता. करवीर) येथे असलेल्या कात्यायनी ज्वेलर्समध्ये चोरट्यानी प्रवेश करून दुकानाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत दुकानातील 1 कोटी 87 लाख 12 हजार 492 रुपयांचे सोने व दागिने आणि रोख रक्कम 1 लाख 50 हजार रुपये असा चोरला होता. दरम्यान या घटनेची दाखल घेत कोल्हापूर पोलिसांनी तपास केला. दरम्यान या गुन्ह्यातील चोरी केलेला माल मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी येणार आल्याची माहिती पोलिसांना समजली तात्काळ एक पथक पोलीस अधीक्षकांनी मध्यप्रदेश येथे पाठवले. या पथकाने सापळा लावून अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा यास एक कार, 5 मोबाईल, एक डोंगल, असा एकूण 6 लाख 58 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान त्याच्या राहत असलेल्या भाड्याच्या घरातून दोन पिस्तल, 7 जिवंत काडतुसे ,दरम्यान स्थानिक सोनारास विकलेले 9 लाख 4 हजार 140 रुपयाची सोन्याची साखळी, असा एकूण त्याच्याकडून 16 लाख 22 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विनायक सपाटे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय हुंबे, संजय कुंभार, विलास किरोळकर, सागर चौगले, सुरेश पाटील, विनोद कांबळे, राजेंद्र वारंडेकर यांनी केली.


0 Comments