Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

संभाजी भिडे विरोधात न्यायालयात याचिका दाखल

 मुंबई/गीता संघर्ष वृत्तसेवा। 

महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संभाजी भिडे यांच्या विरोधात आज महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी याचिका दाखल केली आहे . पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आला असून त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरोधातही शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी कि , शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महापुरुषाच्याबाबत केलेल्या बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी तुषार गांधी यांनी याआधी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी आज संभाजी भिडे यांच्यासह डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वकील असीम सरोदे सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत , युवराज शाह, प्रशांत कोठडीया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर हे यावेळी उपस्थित होते . या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी कारवाई केली नसल्याने याचिका दाखल केली जात आहे.

दरम्यान यापूर्वी 10 ऑगस्टला तुषार गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिना उलटून गेला तरीही योग्य कारवाई करण्यात आली नाही.एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचं. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत थेट शिवाजी नगर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे .

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...