Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

कोरोचीत अचानक अवतरली; तिच्या अवतरण्याने सारेच झाले अवाक

 इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा

कोरोची (ता. हातकणंगले) येथील जलस्वराज्य प्रकल्पाची ऑडिट फाईल सुमारे सात वर्षांनंतर ग्रामपंचायतच्या तिजोरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ माजली. ही फाईल ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याकडे अज्ञात व्यक्तीने आणून दिल्यानंतर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना कल्पना नदेता सदरची ऑडिट फाईल तिजोरीमध्ये ठेवली असल्याचे या कर्मचाऱ्याने खुलासा केला. ग्रामपंचायतीमध्ये आवक – जावक रजिस्टरला नोंद नसताना फाईल आढळल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर बोलावलेल्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यामुळे उपोषणकर्त्यांनी २ ऑक्टोबरपासून साखळी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.

जलस्वराज्य प्रकल्प संदर्भात ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी तक्रारदारांना बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीमध्ये सरपंच संतोष भोरे यांनी उपोषणासाठी ग्रामपंचायतीसमोर बसू नये असे मत मांडले. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार आंदोलन करण्यासाठी अधिकार दिला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची भूमिका असून उपोषणाला बसणार असल्याचे संतोष वाघेला यांनी सांगितले.

सन २०१६ पासून थेट २०२३ ला ऑडिट रिपोर्ट तिजोरीमध्ये कसा काय आला, तसेच ‘आवक-जावक’मध्ये त्याबाबतची नोंद आहे का, असा प्रश्न पुरंदर पाटील यांनी उपस्थित केला. योजनेचे ऑडिट व्हावे, यासाठी सरपंच भोरे यांचेही मत आहे. त्यासाठी आम्ही २ ऑक्टोबरला उपोषणासाठी बसणार आहोत. आपणही पाठिंबा द्यावा, असे सुहास पाटील म्हणाले. दरम्यान, बैठकीमध्ये तोडगा निघाला नसल्याने ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणासाठी बसणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांनी सांगितले. बैठकीस उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य विजय कसबे, सदस्या स्नेहल कोरोचीकर, हलीमा सनदी, कोमल कांबळे,अण्णा शेट्टी, अमर कोरोचीकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...