गडहिंग्लज/गीता संघर्ष वृत्तसेवा।
मिणचे (ता. गारगोटी) येथील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. संदीप प्रदीप देसाई (वय १९, मूळ रा. मिणचे, ता.गारगोटी, सध्या रा. गुजर वसाहत, गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. आज, बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, संदीप हा शिक्षणासाठी गडहिंग्लज येथे वास्तव्यास होता. गुजर वसाहत येथील मारुती सोले यांच्या घरी तो भाड्याने गेल्या काही दिवसांपासून राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने राहत असलेल्या खोलीत गळफास लावून घेतला. सायंकाळी शेजार्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. गडहिंग्लज पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.



0 Comments