मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा।
खिद्रापूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील माता जिजाऊ महिला संस्थेच्या चेअरमन व खिद्रापूर गावच्या प्रथम माजी महिला सरपंच सौ. गीता पाखरे यांची लोक जनशक्ती पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवीभाऊ गरुड यांनी प्रदान केले.
गीता पाखरे यांनी लोक जनशक्ती पार्टीचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री कै खासदार रामविलास पासवान यांच्या दलित सेना या सामाजिक संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्याचा महिला कार्याध्यक्षा व लोक जनशक्ती पार्टीच्या महिला कार्याध्यक्षपदी काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष रविभाऊ गरुड यांनी सौ. गीता पाखरे यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केली. सदर निवडी वेळी पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती सुनिता पवार, संतोष सासणे यांची उपस्थिती होती.




0 Comments