एलान फौंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची होणार चौकशी
कोल्हापूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा।
खिद्रापूरच्या गणेश पाखरे यांनी प्रवर्तन निदेशालय (ईडी)चे संचालक एस. आदिनारायण यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. सविस्तर वृत्त असे की, खिद्रापूर येथील 2019 च्या महापुरामध्ये पडझड झाल्याच्या झालेल्या घरांच्या बांधकामासाठी अभिनेता सलमान खानने गाव दत्तक घेतले होते. हरियाणा गुरुग्रामच्या ऐलान फाउंडेशन मार्फत सदर घरांचे बांधकाम सुरू होते. पण सत्तर घरांपैकी केवळ 39 घरे बांधकाम करून ऐलान फाउंडेशन आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी खिद्रापूर येथून पोबारा केला आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा केली असता चौकशी केली असता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिकचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्याकडे बोट दाखवत आमचा काही संबंध नाही, अशी उडवा उडवीची उत्तरे देत खिद्रापूरच्या गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. बांधकाम करण्यात आलेली घरे देखील निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आले होते. सदर प्रकरणात खिद्रापूर येथील ग्रामपंचायत तत्कालीन लोकप्रतिनिधी पदाधिकारी ग्रामसेवक गावातील स्थानिक हेल्पर यांची महत्त्वाची भूमिका असताना देखील आमचा संबंध नाही असे कागदोपत्री लिखित करून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत गावकऱ्यांचे नुकसान तसेच भ्रष्टाचाराला चालना दिली आहे. ऐलान फाउंडेशनच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी गणेश पाखरे यांनी यावेळी ईडीचे संचालक एस. अधिनारायण यांच्याकडे केली आहे.
इडीचे संचालक एस. आदिनारायण यांनी कागदपत्रांची पाहणी करून ऐलान फाउंडेशन ही खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीकडून कोट्यावधीचे व्यवहार होतात. अशा कंपनीकडून फसवणूक होत असल्याने कार्यालयाकडे तक्रार अर्ज देण्यास सांगितले. अर्ज प्राप्त होतात सदर प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश तात्काळ देऊ, या प्रकरणात स्वतः लक्ष घालू अशी ग्वाही एस. आदिनारायण यांनी दिली. यावेळी अमोल कोलेकर व चंद्रकांत माने हे उपस्थित होते.


0 Comments