Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

मराठा मंडळाचे सांस्कृतिक भवन हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी

जयसिंगपूर /गीता संघर्ष वृत्तसेवा

येथील शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवन हे सर्व समाजातील युवापिढीसाठी उत्कर्ष आणि उन्नतीचे द्वार खुले करणारे प्रेरणादायी ठरेल, असा आशावाद हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. तसेच इमारतीच्या छताचे बांधकाम, पोओपी, लाईट साऊंड सिस्टीम अशा कामासाठी आणखीन 25 लाख रुपयेचा निधी देण्याचे अभिवचन दिले. शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात बुधवारी खासदार धैर्यशील माने व युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ करण्यात आला.

खासदार माने म्हाणाले, या कामासाठी खासदार फंडातून 20 लाख रुपयेची निधी मंजूर झाला होता. शहरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. गावांतर्गत कामासाठी खासदार फंडातून 3.5 कोटी रुपये निधी शिल्लक आहे. लोकप्रतिनिधींनी गावातील प्रलंबित कामे सुचवावी. त्याप्रमाणे निधी दिला जाईल. विद्यार्थ्यांना उद्योग, नोकरी यांचे मार्गदर्शन तसेच आर्थिक स्तोत्र निर्माण होईल यासाठी लवकरच तालुक्यात स्वराज्य भवनाची निर्मिती केली जाईल. समाजातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सांस्कृतिक भवनाच्या वतीने बसविण्यात येणार्‍या सोलर पंपींग कामासाठी यड्रावकर कुटुंबानी निधी द्यावा असे खासदार माने यांनी युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांना आवाहन केले.

यावेळी युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी शहरात 75 कोटी रुपयेची विकासकामे केली आहेत. अनेक विकासकामाची उद्घाटन होणार आहेत. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा उभारला जाईल. या सांस्कृतिक भवना सर्वोतपरी यड्रावकर परिवाराच्या वतीने मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

प्रारंभी माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी स्वागतपर मनोगतात म्हणाले, शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या वास्तुसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य व योगदान आहे. वास्तुचे अंतिम टप्प्यात काम आले असून लवकरच उद्घाटन सोहळा होणार आहे. मंडळाचे प्रमुख बाळासाहेब भांदिगिरे म्हणाले, मंडळाला आज 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. मंडळाला जागा मिळण्यापासून इमारत होईपर्यंतचा सर्व इतिहास त्यांनी सांगितला. यावेळी खासदार धैर्यशील माने यांचा धनाजीराव देसाई यांच्या हस्ते, आदित्य पाटील यड्रावकर यांचा बाळासाहेब भांदिगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्र ताडे, शंकर कलगुटगी, माजी नगरसेवक बजरंग खामकर, अशोक घोरपडे, चंद्रकांत जाधव, लक्ष्मीकांत मीनियार, प्रा.चंद्रकांत मोरे, अभिजीत जगदाळे, पराग पाटील, राहुल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुजाता पाटील, उपप्रमुख आसमा पटेल, शहर प्रमुख रेखा माने, अ‍ॅड.धनंजय पाटील, अभिजीत भांदिगरे, संदिप घोडावत, राकेश खोंद्रे , विक्रमसिंह खाडे, तेजस कुराडे-देशमुख, रमेश कलगुटगी, आबीद पटेल, डॉ.पाटोळे, डॉ. सागर पाटील, बाबासो वनकोरे, अमोल चव्हाण, जितू देसाई, राजेंद्र जाधव-कार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार इंजिनिअर रणजीत महाडिक यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...