इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा ।
अंगात भूत असल्याचे सांगत अघोरी कृत्य करण्यासह सासरी येण्यासाठी 40 तोळे सोने व फॉर्च्युनर गाडीची मागणी करत आणि 61 तोळे सोने व 10 लाखाची फसवणूक करुन घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देऊन तोडफोड केल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन पतीसह दहा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्सिया असगर केरुरे (वय 24 रा. कुडचे मळा) हिने फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये असगर सलीम केरुरे, नुरजहाँ सलीम केरुरे, सलीम पापालाल केरुरे, शहारुख सलीम केरुरे, आफरोज शहारुख केरुरे (सर्व रा. हुपर), हिना सलीम सनदे (रा. पुलाची शिरोली), शबाना फकिर, लुकमान फकीर (दोघे रा. रुकडी), मौलाना जावेद (रा. गडहिंग्लज) व मुजावर (रा. करवेश) यांचा समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सपोनि रोहन पाटील करत आहेत.



0 Comments