Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

हेरवाडमध्ये शांतता: वादग्रस्त स्टेटस प्रकरणावर पडदा

 हेरवाड /गीता संघर्ष वृत्तसेवा। 

वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून रविवारी रात्री हेरवाडमध्ये तणाव निर्माण झाला होता वेळीच पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याने वातावरण शांत झाले. दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधिक्षक समिर साळवी, पोलिस निरीक्षक विकास अडसूळ, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे व पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन केल्यानंतर हेरवाडमध्ये शांतता निर्माण झाली आहे. 

हेरवाडमध्ये एका तरुणाने सोशल मिडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी तातडीने घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, पोलिस उप निरीक्षक अमित पाटील यांनी धाव घेवून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याने वातावरण शांत झाले. दरम्यान हेरवाडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी या घटनेच्या पार्श्वभूमिवर ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, सरपंच रेखा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावातील प्रमुख पदाधिकारी, सर्व समाजाचे नागरीक आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई साठी प्रांताधिकारी यांना प्रस्ताव पाठवून कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच गावातील सर्वांनी एकोपा निर्माण करून शांतता राखण्याचे आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...