Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

डी.के.टी.ई. च्या प्रा. व्ही.ए. कांबळे यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी /गीता संघर्ष वृत्तसेवा। 


येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असणारे प्रा.व्ही.ए.कांबळे यांना विश्‍वेश्‍वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळगावी यांचेकडून पी.एच.डी. इन मेकॅनिकल इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा.व्ही.ए.कांबळे हे गेली २० वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत.  त्यांनी ‘इनवेस्टीगेशन ऑफ दी इन्फयुलएन्स ऑफ दी डिझाईन पॅरामीटर्स ऑन दी परफॉरमन्स मेजर्स ऑफ दी लोड सेल बाय इम्पलेमेंटिंग सेन्सिटीव्हिटी ऍणेलेसिस ऑप्टीमायझीएशन ऍण्ड रोबस्ट डिझाईन टेक्नीकस’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे.

या संशोधनासाठी केएलएस गोगटे इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ जे.के.कित्तूर व डीकेटीईचे मॅकेनिकल विभागातील प्रा. डॉ. व्ही.डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.सदरच्या संशोधनासाठी फाय रिसर्च इन्स्टियूट, इचलकरंजी यांनी प्रायोजित केले. सदरच्या कामासाठी पेटेंट इंडिया ऑफीस कडून पेटंट मिळालेले आहे.

पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या प्र.संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...