सांगली/गीता संघर्ष वृत्तसेवा :
आटपाडीच्या महिला तहसीलदार यांच्या व्हाट्सअपवर पैसे द्यावेत म्हणून भीती घालून अवैध वाळू वाहतुकीवर करीत असलेल्या कारवाईस अटकाव करण्याचे उद्देशाने अश्लील बदनामकारक मजकूर टाकून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असण्याची फिर्याद तहसीलदारांनी आटपाडी पोलिसांमध्ये दिली आहे. याप्रकरणी विजय श्रीरंग यादव रा.मुंबई आणि मंडले रा.शिरढोण ता.कवठेमहांकाळ या दोघा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,विजय श्रीरंग यादव रा.मुंबई याने मंडले रा.शिरढोण ता.कवठेमहांकाळ याच्या मदतीने संगणमत करून सन २०२१ पासून ते १९ एप्रिल दरम्यान महिला तहसीलदारांना वेळोवेळी व्हाट्सअप या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अश्लील पोस्ट टाकून त्यांनी पैसे द्यावे म्हणून भीती घालून अवैध वाळू वाहतुकीवर करीत असलेल्या कारवाईस अटकाव करण्याचे उद्देशाने अश्लील बदनामकारक मजकूर टाकून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे,अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.


0 Comments