इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा :
रमजान ईद सणाच्या दिवशी इचलकंरजी शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते डेक्कन कडे जाणा-या स्टेशन रोडवरील इदगाह मैदानावर सामुदायीक नमाज पठण कार्यक्रम पार पडणार आहे. या नमाज पठण करीता इचलकंरजी शहरातुन तसेच आजुबाजूच्या गावातील मुस्लीम समाजाचे लोक मोठया प्रमाणात येत असतात त्यामुळे या इदगाह मैदान हे शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर येत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते व नमाज पठणाच्या वेळी नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम समाजाच्या लोकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नमाज पठण करीता वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम १(ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी इचलकरंजी शहरातील रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले आहेत.
रमजान ईद सणानिमीत्त नमाज पठणाच्या कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेचे दृष्टीकोनातून केलेली उपाय योजना सर्व संबधीताना माहिती होण्यासाठी हा जाहिरनामा जारी करीत आहे. वाहतुकीसाठी बंद व चालु केलेले मार्ग खालील प्रमाणे.....
१. हातकणंगले कडुन डेक्कन मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कॅब्सन हॉटेल पासुन इदगाह मैदान कडे बंदी घालण्यात येत आहे त्यांना पर्यायी मार्ग कॅब्सन हॉटेल पासुन राधाकृष्ण चौक व जुने एसटी स्टँड कडे वाहतुक वळविण्यात येत आहे.
२. शिवतीर्थ येथून डेक्कन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खंजीरे पेट्रोल पंप पासुन इदगाह मैदान कडे बंदी घालण्यात येत आहे. त्यांना पर्यायी मार्ग यशवंत प्रोसेस मार्गे छत्रपती शाहू पुतळा कडे वाहतुक वळविण्यात येत आहे.
३. थोरात चौक कडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी थोरात चौक येथुन इदगाह मैदान कडे बंदी घालण्यात येत आहे त्यांना पर्यायी मार्ग जनता चौक व वर्धमान चौक कडे वळविण्यात येत आहे.
४. बालाजी वेअर हाऊस इंडस्ट्रीयल इस्टेट कडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बालाजी वेअर हाऊस येथुन इदगाह मैदान कडे बंदी घालण्यात येत आहे. त्यांना पर्यायी मार्ग महाराष्ट्र वजन काटा कडे वळविण्यात येत आहे.
तसेच दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी शिवजयंती निमीत्त शिवज्योत घेवुन येणाऱ्या शिवप्रेमींना स्टेशन रोडवरील कॅब्सन हॉटेल पासुन शिवतीर्थ कडे येण्यासाठी व जाण्यासाठी रोडच्या दुभाजकाच्या पुर्वे कडील रस्ता खुला ठेवण्यात येत आहे.
हा जाहिरनामा व त्यामध्ये नमुद केलेले निर्देश दि. २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा पासून ते नमाज पठण संपेपर्यंत अंमलात राहणार आहे.
.jpeg)




0 Comments