Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

कल्पद्रुम आराधना महोत्सवात रविवारी श्रावक श्राविकांची मोठी गर्दी

 

जयसिंगपूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।


 
जयसिंगपूर येथे श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व श्री कल्पद्रुम आराधना महा महोत्सव समिती यांच्यावतीने आयोजित महामंडळ विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ आराधना महोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी श्रावक श्राविकांनी प्रचंड गर्दी केली होती, जयसिंगपूर चे सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते तर धर्मसभा मंडप खचाखच भरला होता, कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो श्रावक श्राविकांनी महामहोत्सवामध्ये उपस्थित राहून पुण्यप्राप्ती केली, महामंडळ विधान महोत्सवा मध्ये भगवंतांच्या नामस्मरणात नमोकार मंत्राच्या जयकारात अत्यंत मंगलमय आणि धार्मिक वातावरणात मुनीश्रींच्या पावन सानिध्यात पाचशे मुला मुलींवर सरस्वती संस्कार करण्यात आले,हा सोहळा सर्वांसाठी विलक्षण ठरला, दरम्यान महोत्सवस्थळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार  मादनाईक आदी मान्यवरांनी  सदिच्छा भेट दिली,  मुनीश्रींचे शुभ आशिर्वाद घेतले, महोत्सव समितीच्या वतीने त्यांना पार्शनाथाची प्रतिमा व वस्त्रदान देऊन सन्मानित करण्यात आले,रविवारी पहाटे मंगल नादाने सुरुवात झाली सौधर्म इंद्र इंद्रायणी व मुख्य चक्रवर्ती यांचे मिरवणुकीने धर्मसभा मंडपात आगमन झाले, मिरवणुकीने जलकुंभ धर्मसभा मंडपात आणल्या नंतर सरस्वती संस्कार विधीला सुरुवात झाली,यावेळी परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज, परमपूज्य 108 धर्म सागरजी महाराज, परमपूज्य 108 सिद्धांत सागरजी महाराज यांच्यासह मुनी संघ यांच्या पावन सानिध्यात 500 मुला मुलींवर सरस्वती संस्कार करण्यात आले,  कल्पद्रूम आराधना  महोत्सवा अंतर्गत  मांगलिक विधीस सुरुवात झाली, बीजाक्षर भगवंतावर जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, शांतीधारा असे विधी मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात संपन्न झाले, यावेळी अष्टकुमारी, पंचकुमार यांच्यासह मंदिर ट्रस्टी, महोत्सव समितीचे पदाधिकारी वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन महिला परिषद, जैन युवा मंच, श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, रविवारी दिवसभराचे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले, महोत्सवानिमित्त आयोजित आहार दान विभागात हजारो श्रावक  श्राविकांनी आहार घेतला.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...