निपाणी / गीता संघर्ष वृत्तसेवा
निपाणी ग्रामिण पोलिसांनी संशयित चौघा दुचाकी चोरांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीतील तब्बल २४ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या ४१ दुचाकी जप्त केल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.
निपाणी ग्रामिण पोलिसांनी आज दुचाकी चोर युवराज संजय पवार (वय ३५), विनायक तानाजी कवाळे (वय २८ दोघे रा. कुर्ली ता.निपाणी), दयानंद संभाजी शेटके (वय ३६) व तानाजी संभाजी शेटके ( वय ३९ दोघे रा. हदनाळ ता. निपाणी) ताब्यात घेतले.
तसेच त्यांनी चोरलेल्या दुचाकी निपाणी, संकेश्वर, यमगर्णी, गोकाक, सौंदलगा, खडकलाट, कागवाड, अथणी व हुक्केरी तालुक्यातील कमतनूर चिकालगुड्ड, नेर्ली, हारगापूरवाडी, खानापूर, हंज्यानट्टी, खोत्री येथून हस्तगत केल्या.
ही कारवाई वरिष्ठ अधिकारी महालिंग नंदगावे, चिकोडी डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या
नेतृत्वाखाली निपाणी ग्रामिण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिलकुमार कुंभार व त्यांच्या स्टाफने केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.









0 Comments