जयसिंगपूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा
चिंचवाड ता. शिरोळ येथील ककडे मळा नंदीवाले वसाहत येथील सौ. चंपाबाई भुपाल ककडे वय ६५ वर्षे या वृद्ध महिलेच्या अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केली असल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणास संशयित ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अरिहंत उर्फ किरण महावीर चौगुले रा हुपरी यांनी दिली आहे.
शिरोळ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सौ चंपाबाई भुपाल ककडे व तिचा पती भुपाल तातोबा ककडे वय ७० वर्ष हे दोघे चिंचवाड ककडे मळा नंदीवाले वसाहत येथील घरात राहात होते, तर त्यांचा मुलगा हुपरी येथे राहतो. शनिवार
दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ककडे दापत्य घरात दोघे असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील पहिल्या खोलीत झोपलेल्या सौ. चंपाबाई ककडे यांना मारहाण करून यांच्या अंगावरील साडीच्या पदराने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बोरमाळ व कानातील सोन्याची फुले असा अंदाजे ८० हजार रुपयांचे दागिने काढून घेतले.
दरम्यान, आज रविवार दिवसभर शिरोळ पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री गायकवाड पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी
शिरोळ पोलीस ठाण्यास व चिंचवाड येथील घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत योग्य त्या सूचना करून तात्काळ खुण्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी एकास ताब्यात घेतले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे पो. हे. कॉन्स्टेबल सागर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन कोष्टी हे करीत आहेत.










0 Comments