उत्तम भोई याजकडून कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा।
बस्तवाड ग्रामपंचायतीच्या सन २०१६ ते २०२१ सालापर्यंतच्या सरपंच व सदस्यांनी विकास निधीत भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या कालावधीतील ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशी
होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप चौगुले व विद्यमान सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत. त्यामुळे बस्तवाड गावात एकच खळबळ उडाली आहे
दरम्यान, तत्कालीन प्रशासक व ग्रामसेवक विनायक शेवरे, आय आय कोळी यांचाही या कामकाजात सहभाग असल्याचा आरोप सरपंच चौगुले यांनी करत आमच्याही कार्यकाळाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१६ साली ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण हे अनु. जाती महिलासाठी राखीव होते.
संपूर्ण कालावधीत प्रज्ञा जितेंद्र चव्हाण या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. तर ६ महिने प्रशासक म्हणून सौ. वर्षा पाटील
यांनी काम पाहिले. दलितवस्ती सुधार योजना, २५/१५ योजना, १५ वा वित्त आयोग व इतर योजनेच्या निधीतून झालेल्या कामकाजात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. तत्कालीन
ग्रामसेवक शेवरे यांनी या विकास कामाबाबतीत आणि आलेल्या निधीत गोंधळ घातला आहे. तरी सन २०१६ ते २०२०-२१ अखेर पर्यंत ग्रामपंचायत कामकाजाची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी, अशी
मागणी केली आहे. सरपंच चौगुले यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आरोपासंदर्भात माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
उपसरपंच बाळासो कोळी, ग्रा. सदस्य श्रीशैल जंगम, कृष्णा कांबळे, श्रीमती. आशा नाईक, शानाबाई लाटकर, श्रीमती. किरण कांबळे, अम्माजन पाटील, संगीता कांबळे आदींच्या सह्या आहेत.












0 Comments