इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा।
आंतरभारती शिक्षण मंडळ, संचलित माध्यमिक विद्यालय सावर्डे- सडोली दुमाला या विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन
उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रास्ताविक श्री पी.पी. पाटील सर यांनी केले, संविधान उद्देशिकेचे वाचन सामूहिक रित्या
करण्यात आले. ध्वजारोहण सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मूरतले सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व तीन कौमिनारे यासह 'भारत हा माझा प्यारा' व 'सदैव सैनिका पुढेच जायचे'या गीतांचे समूह गायन करण्यात आले. यानंतर
सडोली दुमाला या गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गावांमध्ये घोषणेसह हर घर तिरंगा जनजागृतीचा कार्यक्रम
मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सी.एस.पाटील सर, श्री कदम सर,
श्री मूरतले सर, श्री पी पी पाटील सर, सौ भोसले मॅडम, श्री बी पी पाटील सर, श्री केसरकर सर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री पांडुरंग म्हातुगडे, श्री तानाजी म्हातुकडे व गणपती शिंदे
यांच्यासह शाळेचे सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भोसले मॅडम यांनी केले.










0 Comments