पुणे / गीता संघर्ष वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रात पावसाने धुवांधार बॅटिंग सुरु केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यभर पावसाने धुमाकुळ घातला. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं राज्यभर पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



0 Comments