Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे 14 लाख 89 हजाराची वीज चोरी

 कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा


कोल्हापूर जिल्ह्यातील येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने माणगाववाडी (ता. हातकणंगले) पकडली आहे. या ग्राहकांने वीजमीटरचा डिस्प्ले चालू वा बंद करता येईल, अशा पध्दतीने ,

वीजमीटरमध्ये फेरफार करून ९४ हजार ९८५ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे १४ लक्ष ८९ हजार रूपयांची वीजचोरी केली. सदर प्रकरणी महावितरणने सागर बजरंग कांबळे व वीजवापरकर्ते खान यांचेविरूध्द वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शहाबुद्दीन रोजअली माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील वीजग्राहक नामे समर्थ चर्मकार माग. औ. संस्था मर्या. चे वीजमीटरची तपासणी दि. १४ जून २०२२ रोजी करण्यात आली. वीजमीटरचा डिस्प्ले वारंवार चालू वा बंद करण्याची योजना या ग्राहकाने केली होती. ही बाब स्थळ तपासणी व मिटर नोंदी संग्राहक प्रणालीच्या (चऊड ) अहवालानुसार


उघडकीस आली. वीजचोरीच्या निर्धारित १० महिने कालावधीत ९४ हजार ९८५ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू. १४ लक्ष ८९ हजार ९२०/- व तडजोडीचे रक्कम रू.९ लक्ष १० हजार / इतके बिल देण्यात आले. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने सदरील बिल भरले नाही.


सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा २००३, कलम १३५ अन्वये समर्थ चर्मकार माग. औ. संस्था मर्या. चे अध्यक्ष सागर बजरंग कांबळे व वीजवापरकर्ते

शहाबुद्दीन रोजअली खान यांचेविरूध्द कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक अभियंता नितीन जोशी.  साजणे शाखा अभियंता यु. आर. कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी, निखिल कांबळे यांनी ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...