Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

स्वातंत्र्यदिनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

उत्तम भोई यांजकडून : कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा                               


                                                                                                                                                 खिद्रापूर तालुका शिरोळ  येथे 2019 चा महापुरामध्ये घरकुलासाठी ऐलान फाउंडेशन कडून मदत आली होती. जिल्हा परिषदेचे संबंधित जबाबदार अधिकारी आणि ग्रामपंचायत                              

                                                                         प्रशासन यांचेतील परस्पर संगनमताने खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना शासनाकडून आलेले 95 हजार 100 रुपये जे महापुरात घर घर पडझड होऊन जीवनावश्यक वस्तूंचा लाभ मिळावा, पुढील जीवन व्यतीत करण्यासाठी आधार

                                                                                             म्हणून दिलेल्या रकमेवर डोळा ठेवून वसूल करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर सदरची रक्कम स्वीकारून देखील उत्कृष्ट प्रकारची घरे पात्र लाभार्थ्यांना देता आली नाहीत. एकूण 70 घरे मंजूर झाली होती. पण अद्यापही कोणतेच घरकुल परिपूर्ण नाही. सर्व काम अर्धवट असून लाभार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात. यासाठी लाभार्थ्यांनी आंदोलने ही केली. प्रशासनाने योग्य ती चौकशी करून कार्य मार्गी लावू अशी आश्वासन देऊन आंदोलनाला स्थगिती देऊन आंदोलन माघार घेण्यास सांगितले. 

८ लाख .पण अद्यापही त्याची चौकशी झालेली नाही. अधिकाऱ्यांना या गोष्टीचे गांभीर्य नाही. त्यामुळे अधिकारी व ऐलान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण व्यवहार झाले, असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाच्या मानगुटीवर बसून भ्रष्टाचाराचा फर्दाफाश केल्याशिवाय ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत, अशी चर्चा होत आहे. गेले अनेक दिवस प्रसिद्धी माध्यमातून घरकुल बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. 

 वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुद्धा याचा आढावा सादर केला गेला. त्याचाही काही परिणाम झाला नाही. एका माजी मंत्र्यच्या भाच्याचा यामध्ये हात असल्याकारणाने त्या भाच्याच्या जीवावरच 'आमचं कोणी काही वाकडे करणार नाही'. ह्या अविर्भावात वावरत आहेत.                                                    
 मात्र घरकुल योजनेचा फज्जा उडाला आहे. दलित मागासवर्गीय कुटुंबाला त्रास देण्यात देखील यांचा खूप मोठा हात       आहे.  याबाबत  ग्रामस्थ एकत्र येऊन बैठक घेऊन पुढील आंदोलनाची तयारी करताना दिसत आहेत. अन्याय सहन करून घेणार नाही. 
     

                                                                                         योग्य तो न्याय पात्र लाभार्थ्यांना मिळालाच पाहिजे, यासाठी आता गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ येथे लाभार्थ्याकडून 15 ऑगस्ट 2022 रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे.



Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...