Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

अखेर यड्रावकर समर्थक बोलले - धो धो पडतोय पाऊस, पाऊस पडताना लागली गळती

  खिद्रापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा





अभिनेता सलमान खानने दत्तक घेतलेल्या खिद्रापूर गावातील घरकुलांचा प्रश्न आता वेगळ्या वळणावर आला आहे. ज्यांच्या कृपेने येथील घरकुलांची बांधकामे सुरू होती त्या बांधकामांचा दर्जा पाहता आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निकटवर्तीय समर्थकच यावर भाष्य करताना दिसत आहेत. गीता संघर्षशी बोलताना यड्रावकरांचे निकटवर्तीय खिद्रापूर येथील समर्थक म्हणाले की,

ऐलान फाउंडेशन अंतर्गत येथील घरकुलांची बांधकामे करणारे इंजिनियर आय.आय. पटेल हे म्हणाले होते की,जी काही मी घरे बांधलोय त्याची काही तक्रार आली तर सर्वस्वी जबाबदार मी आहे. पण आता घरकुलांच्या गळत्या सुरू असताना इंजिनिअर आय.आय. पटेल हे दुरुस्ती करून का देत नाहीत. तसेच यड्रावकर समर्थक यावर विशेष टिप्पणी करताना म्हणाले," धो धो पडतोय पाऊस, पाऊस पडता लागलीय गळती. गळतीमुळे शॉवरचे स्वरूप, कोपेश्वर मंदिरानंतर वाटर पार्क सलमान खानची घर. ज्याचं गळतय ते यड्रावकरचे निकटवर्तीय, एवढा दबाव तंत्र कसा काय आणि मूग गिळून गप्प का? आवाज उठवणाऱ्यांचाच आवाज दाबले गेले." अशा पद्धतीची टिपणी यड्रावकर समर्थकच करत आहेत.

आता तरी प्रशासनासहित सर्व जागे होतील का? इथल्या लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने घर मिळतील का? कारण आता यड्रावकर समर्थकांनीच या विषयावरती बोलावयास सुरुवात केली आहे. काही ठराविक लोकांच्या हाती कारभार देऊन संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या त्या लोकांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार. 

यड्रावकर खिद्रापूर परिस्थितीवर काय निर्णय घेणार काय?   ग्रामपंचायत खिद्रापूरचे सर्व सदस्य सरळ सरळ आरोप करतात की, संबंधित घरकुलांच्या बाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाचा काही संबंध नाही. सदस्यांचा काही संबंध नाही. कारण ग्रामसेवक अकीवाटे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता ऐलान फाउंडेशनच्या गावातील घरकुल बांधकामा संदर्भात परस्पर ठराव घातले आहेत. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराविरोधात सर्व सदस्य ग्रामसेवक अकीवाटे यांचे वर कारवाई होण्यासंदर्भात उपोषणास देखील बसले होते.

  पण येथील आमदारांच्या हस्तक्षेपामुळे अकीवाटे यांना वरदहस्त मिळाला होता. इथल्या कारभाराला इथल्या घरकुलांना तिलांजली मिळावी. यासाठी ग्रामसेवक अकीवाटे यांची होणारी बदली टाळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना ग्रामपंचायत सदस्यांचे न ऐकता अभय देण्यात आले. खिद्रापूर मधील सद्य परिस्थितीला गावाची बदनामी होण्याला गावापासून सर्व सदस्यांच्या पासून लपून छपून काम करणाऱ्या अकिवाटेला पाठीशी घालणारेच जबाबदार आहेत. 


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...