Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

टाकळीवाडी गावातील माजी सैनिक व गावातील नागरिकांनी केली शाळेमध्ये स्वच्छता

टाकळीवाडी/ गीता संघर्ष वृत्तसेवा (नामदेव निर्मळे यांजकडून)

      




    टाकळीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर येथे माजी सैनिक तसेच गावातील नागरिकांनी श्रमदानातून शाळा परिसरातील स्वच्छता केली आहे.


     देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले गावातील सर्व माजी सैनिक यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.


देश सेवेबरोबर  समाजसेवेचा वसा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे . कौतुस करण्यासारखे आहे.

   ज्या शाळेने घडवले त्याची कुठेतरी जाणीव ठेवून आज शाळेमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली.शाळेचे उपकार हे नेहमी ऋणी राहतील. आम्हाला इथून पुढे देश सेवेबरोबर समाज सेवा ही करायचे आहे.असे  प्रतिपादन सेवानिवृत्त सर्व माजी सैनिक म्हणाले. 


    टाकळीवाडी गावातील सर्व माजी सैनिक दादा खोत, रमेश निर्मळे ,केंदबा कांबळे, भागुजी निर्मळे ,महादेव बदामे,


बळीराम कांबळे ,नंदू कांबळे, संजय  बदामे ,लक्ष्मण निर्मळे ,पांडुरंग निर्मळे ,वसंत बिरणगे ,तसेच गावातील नागरिक बाजीराव गोरे,

तात्यासो सुतार ,गोरख निर्मळे, धवल पाटील, तुकाराम भमाने, लक्ष्मण भमाने, खंडू कांबळे, समीर आरकाटे, व नामदेव निर्मळे समाजसेवेसाठी व श्रमदानासाठी उपस्थितीत होते.  विशेष म्हणजे ऑन ड्युटीवर असणारे भारतीय जवान पांडुरंग निर्मळे हे सुट्टीवर आले असताना सुद्धा समाजकार्य करण्यात सहभागी होते.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...