खिद्रापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा
खिद्रापुरातील घरकूल प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी खिद्रापूरचे ग्रामस्थ दयानंद खानोरे यांनी केली आहे.
खिद्रापूर येथे बांधकाम करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून जादा काम झाल्याचे सांगून संबंधितांनी जादा रक्कम वसूल केल्याचे लाभार्थीकडून सांगितले जात आहे.
तर इतर घर पडझड झालेल्यांना लाभ मिळण्यासाठी तसेच अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि फाऊंडेशन प्रतिनिधीकडे ग्रामस्थांनी विचारणा
केली असता आमचा संबंध नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या घरकूलचा कर्ता-करविता कोण त्याचा शोध घ्यावा आणि या
या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दयानंद खानोरे यांनी केली आहे.








0 Comments