खिद्रापूर / गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज खिद्रापूर येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरात 'महारुद्राभिषेक' घालून त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हा धार्मिक कार्यक्रम साजरा केला.
यावेळी कुलदीप कदम यांनी कोपेश्वरास रुद्राभिषेक घातला. संपूर्ण रुद्राभिषेक मयूर संघाचे संजय पाटील आणि त्यांचे चिरंजीव ॲड. सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मंदिराचे पुजारी रमेश जोशी यांनी पौरोहित्य केले.
या शुभप्रसंगी बसगोंडा पाटील, हरिश्चंद्र पाटील, मियाखान मोकाशी, ॲड. सुरेश पाटील, अविनाश मगदूम, सत्तार मोकाशी, मानतेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा देण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. धार्मिक विधी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीने हा वाढदिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
---



0 Comments