Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

पाकिस्तानात चोराच्या हातात दिल्या किल्या : मुनिर झाला महाचोर.

राष्ट्रीय/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे, याचदरम्यान पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख जनरल आसिम मुनीर याला सुपर पावर मिळाली आहे, पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टानं एका सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. यामुळे आता पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टानं एका सुनावणीदरम्यान असा आदेश दिला आहे की, सामान्य नागरिकांवर देखील मिलिट्री कोर्टमध्ये केस चालू शकते. ज्याची सजा मृत्यूदंड देखील असू शकते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानचा आर्मी प्रमुख जनरल आसिम मुनीर याच्या हातात सुपर पावर आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायामुळे तो आता देशातील कोणत्याही नागरिकाला देशासाठी धोका असल्याचं सांगून त्याच्याविरोधात मिलिट्री कोर्टमध्ये केस चालवून शकतो. यामुळे पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांची तर चिंता वाढलीच आहे, मात्र दुसरीकडे विरोधी पक्षांमधील नेत्यांची देखील पाचावर धारण बसली आहे.

पाकिस्तानच्या कोर्टानं सात मे रोजी हा निर्णय दिला आहे. ज्यामुळे पूर्वीचा जो निर्णय होता तो आता मोडीत निघाला आहे. न्यायालयानं आपल्या पहिल्या निर्णयात म्हटलं होतं की, मिलेट्री कोर्टात सामान्य नागरिकांच्या विरोधात केस चालवणं हे कायद्याला धरून नाही, मात्र कोर्टानं आता आपलाच निर्णय बदलला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, सामान्य नागरिकांविरोधात देखील मिलेट्री कोर्टात केस चालू शकते, ज्याची सजा मृत्यूदंड देखील असू शकते, कोर्टाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आर्मी प्रमुखाची ताकद आता आणखी वाढली आहे. यामुळे कोणत्याही सामान्य नागरिकावर देशाला धोका असल्याचं ठरवून त्याच्यावर मिलेट्री कोर्टमध्ये केस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला आहे, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...