Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

खिद्रापूर आणि जुने दानवाड येथे गणपतराव पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा उत्साहात

खिद्रापूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा:


  खिद्रापूर आणि जुने दानवाड येथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा जन आशीर्वाद दौरा अतिशय उत्साहात पार पडला. मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला.


       खिद्रापूर येथे पदयात्रेनंतर झालेल्या सभेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलासराव कांबळे यांनी विधानसभेची ही निवडणूक सोपी नसल्याचे सांगून आपले हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न महायुती करत आहे. संविधान वाचवण्यासाठी सर्वच मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे असे सांगितले. डॉ. राजश्री पाटील, गणेश पाखरे, कु. बुशिरा खोंदू, रवींद्र कदम आदींनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांच्या हात या चिन्हावर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आवाहन केले. यावेळी संजय पाटील, डॉक्टर राजगोंडा पाटील, सरपंच सारिका कदम, मारुती सलगर, बाळू देसाई, कदम सर, अमित कदम, रमजान शिरगुप्पे,  कुलदीप कदम, बसगोंडा पाटील, इकबाल मोकाशी, आदिलशहा जमादार, गौस कागवाडे, सुभाष लडगे, राजू गुरव, बाबू गुरव, हमीद मोकाशी, शिवाप्पा खोत, भाऊसो रायनाडे, अण्णासाहेब पाटील, मदार मोकाशी, दत्तात्रय कदम, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


       जुने दानवाड येथे झालेल्या प्रचार यात्रेमध्ये रघुनाथ पाटील, अरुणकुमार देसाई, भवानीसिंह घोरपडे, महेंद्र बागे, राजश्री मालवेकर, रेखा पाटील, माजी सरपंच शशिकला वाडीकर, बाळासाहेब कांबळे, सतीश भंडारे, राजेंद्र प्रधान, आलगोंडा पाटील, भरमा गुरव, खंडू चव्हाण, धनपाल वडगावे, बंडा नांगरे पाटील, अशोक अंबुपे, शिवाप्पा गुरव, दीपक पाटील, रावसाहेब अंबुपे, कपिल पाटील, जयप्रकाश पाटील, अण्णासाहेब पाटील, बाळू कोकणे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत राजेंद्र प्रधान म्हणाले, शिव, शाहू, फुले, आंबेडकर समाज आज दादांच्या पाठीशी उभा आहे. जातीवादी शक्ती संविधानाची पायमल्ली करीत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुराज्याची पताका फडकवण्याचे काम आम्हाला करायचे आहे. दादा हे विचारांचे वारसदार असून शिरोळ तालुक्याला नवी देशा देण्याचे काम ते करतील. भवानीसिंह घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...