Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

गोवा बनावटीची दारु जप्त.एक जण ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।


  गोवा बनावटीची दारुचा साठा करून ठेवल्या प्रकरणी शिवाजी धाकलू गावडे (वय 38.रा.पार्ले ,ता.चंदगड ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्या कडील सात लाख रुपये किंमंतीची गोवा बनावटीची दारु जप्त करून त्याच्या विरोधात प्रोव्ही कायद्यानुसार चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढ़ील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुशंगाने दारुवर कारवाई करण्यासाठी  माहिती घेत असताना चंदगड तालुक्यातील पार्ले येथे जुवाब सालदाना यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावर गोवा बनावटीची दारुचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात या पथकातील पोलिसांनी छापा टाकून शिवाजी गावडे याला अटक केली.त्याच्या कडील सात लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस सुरेश पाटील,रामचंद्र कोळी,समीर कांबळे,राजू कांबळे,प्रकाश पाटील,दिपक घोरपडे,सागर चौगुले आणि सुशील पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...