Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

इचलकरंजीत जुगार खेळणाऱ्या १३ जणांवर कार्यवाही

इचलकरंजी येथे जुगार खेळणाऱ्या 13 जणांना पकडून रोख रक्कमेसह एकूण 1,66,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,  गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी.


इचलकरंजी
 / गीता संघर्ष वृत्तसेवा।सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाणे व प्रभारी अधिकारी यांना दिले होत्या.

काल कॉमिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस निरीक्षक  रवींद्र कळमकर यांना लाल नगर इचलकरंजी येथील एका इमारतीमध्ये काही ईसम जुगार खेळत असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने  जावून छापा टाकला असता लालनगर येथील बंदिस्त इमारतीमध्ये पत्त्यांचा अंदर बाहर नावचा जुगार खेळणारे १३ इसम मिळून आले. सदर इसमांचे ताब्यातील  रक्कम 92,000/- रुपये, 10 मोबाईल हँन्डसेट व जुगार खेळाचे साहित्य असे एकूण 1,66,800/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. त्या ठिकाणी मिळून आलेला मॅनेजरकडून जुगार चालवणाऱ्या मालकाची माहिती घेऊन त्यांचेसह एकूण १५ आरोपीविरुध्द इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळून आलेल्या मुद्देमालासह  १३ आरोपींना इचलकरंजी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,  महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक  रायबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, सागर चौगले, महेश पाटील, प्रदिप पाटील, सागर माने, लखनसिंह पाटील व हंबीरराव अतिग्रे यांचे पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...