कोल्हापूर /गीता संघर्ष वृत्तसेवा।
तळंदगे, (ता हातकणंगले ) येथील विराज प्रदीप कुंभार ( व व ७ ),रंग सावळा, अंगावर निळी जीन्स पॅन्ट व आकाशी रंगाचा फुल शर्ट, या वर्णनाचा मुलगा हा बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घरात काही न सांगता निघून गेला होता. सदरबाबत हुपरी पोलीस ठाणे येथे तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर मुलाचा हुपरी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक नागरिक, शोध घेत होते. कोल्हापूर पोलीस दलाने डॉग स्क्वाड चा वापर करून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, स्टेला श्वान हे मलकारसिद्ध मंदिर येथील विहिरीजवळ जाऊन थांबले. तसेच परीट नावाच्या इसमाने देखील सदर मुलास त्या मंदिराजवळ पाहिल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मुलाच्या घरी व सदर विहिरीजवळ जाऊन भेट दिली. तसेच पोलीस पथकाला विहिरीचे पाणी काढून मुलाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान हुपरी येथील जलतरणपटू तानाजी मेटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व अंमलदार निवृत्ती माळी यांनी विहिरीत पोहून मुलाचा शोध घेतला असता
मुलाचा मृतदेह विहिरीतून मिळून आला. सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता मुलाचे वडील यांनी मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचे ओळखले. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून हुपरी येथील नागरिकांनी मुलाचा मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली. तसेच पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे समाधान व्यक्त केले आहे.


0 Comments