Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

राधानगरीमधून प्रकाश आबिटकर-चंद्रकांत पाटील यांची घोषणा

कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा : 
आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्या वेळी काही कारणांनी मंत्री पद मिळाले नाही, पण राजकारणात वेळ यावी लागते ती वेळ यावेळी येईल. दोन महिन्यांनी भावी आमदार प्रकाश आबिटकर असतील, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मी आलो नाही म्हणून चुकीचा मेसेज मतदारसंघात फिरू नये आणि शिवाय पत्रकारांना देखील हेडिंग मिळू नये म्हणून आलो असल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोणी दिले असे म्हणतील. त्यांना मंत्रीपद मिळावे हा माझा आशावाद आहे  माझ्या सर्व नेत्यांना सांगतो युती धर्म सर्वांना पाळायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्याचे आमदार प्रकाश आबिटकर असा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रकाश अबिटकरांचे वडील बिद्री कारखान्याचे कामगार आणि माझे वडील गिरणी कामगार होते. गिरणी कागारांची मुले मंत्री आमदार कसे होतात, हे काँग्रेसचे दुखणे आहे. मुख्यमंत्री रिक्षाचालक होते, त्यांनी खूप कष्ट केले, त्यांना भेटले की बरे वाटते. आम्ही देखील दूध विकून चांगल्या शाळेत गेलो असल्याचे ते म्हणाले. शाळा चांगली असेल तर मुलांचे शिक्षण चांगले होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2024 मध्ये तिन्ही पक्षांच्या मिळून 170 च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारने लोकांना दिल्या आहेत. या योजना देऊनही लोक उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखे महाराष्ट्र ची जनता नाही. उपकाराची भावना काहींनी ठेवली असती, तर 2019 मध्ये युतीचे सरकार आलं असतं. आता त्यांचं जे नुकसान झाले ते झालं नसतं, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर नाव न घेता केली. पाटील यांनी सांगितले की, अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते 2029 बाबत बोलले असतील. राज्यामध्ये 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून  संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही कडाडून टीका केली आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...