मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा :
आईची हत्या करून शरीराचे लचके तोडणाऱ्या आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने शिक्षा कायम ठेवली आहे. “आरोपी सुनील कोंचीकोरवीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर तो सुधारण्यासारखा नाही, त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही”, असं निरीक्षण यावेळी मुंबई हायकोर्टाने नोंदवलं. आरोपी सुनील कुंचीकोरवीने जन्मदात्या आईची दारूच्या पैशांसाठी हत्या केली होती. आरोपी तेवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आपल्या आईच्या शरीराचे लचके तोडत ते शिजवून खालले देखील होते. कोल्हापुरातल्या माकडावाला परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला ही भयंकर घटना घडली होती. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने ८ जुलै २०२१ लाआरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने तीच शिक्षा आता कायम ठेवली आहे. या प्रकरणी आता आरोपीला 30 दिवसात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुभा आहे.


0 Comments