Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांचा जयसिंगपूर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा

जयसिंगपूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।

 शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाला उधाण येत आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सांगली - कोल्हापुर रोड लगत असलेल्या आंबा भडंग जवळील यड्रावकर लॉन येथे सकाळी ९ वाजता कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

आमदार यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. आमदार यड्रावकर यांनी विकास कामात सर्वच समाजाला सामावून घेतल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे. शिरोळ मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

२४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात समर्थक, स्थानिक नेते आणि गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी आमदार यड्रावकर यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आमदार यड्रावकर यांनी त्यांच्या कार्यकालात केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्याबद्दलची लोकप्रियता वाढली असून, त्यामुळे या निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळणार आहे. आमदार यड्रावकर यांनी शिरोळ मतदारसंघातील आरोग्याच्या सुविधा, क्षारपडचा पायलट प्रोजेक्ट, रस्ते आणि पायाभूत सुविधांचे जाळे, जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यासह तालुक्यातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच तालुक्याचा शाश्वत विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रकल्पांनी मतदारसंघात चांगले परिवर्तन घडवून आणले आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...