कुरुंदवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा।
आरटीओने मान्यता दिलेली मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कुलची गाडी चक्क विद्यार्थी वाहतुकीचे काम करीत आहे. गाडीवर मोटार ड्रायव्हिंग स्कुल असे लिहिले आहे. सोबत आरटीओ मान्यता प्राप्त हे शब्द लिहायला बिलकूल विसरले नाहीत. आरटीओ मान्यता प्राप्त असणाऱ्या गाडीने तरी आरटीओच्या नियमाचे पालन करायला हवे. पण इथे असे न होता उलटेच झाले आहे. गाडी 7 सीटर असताना देखील या गाडीत प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबल गेलंय. आरटीओच्या सर्वच नियमांचे उल्लंघन या आरटीओ मान्यता प्राप्त गाडीने केले आहे. आरटीओतील कोणत्या अधिकाऱ्यांनी यांना मोटार ड्रायव्हिंग स्कुलचा परवाना दिला आहे, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.



0 Comments