नामदेव निर्मळे यांजकडून
घोसरवाड ता. शिरोळ येथील जागृत देवस्थान गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर देवाचे आश्वाचे आज आगमन झाले.. सिद्धेश्वर देवस्थान 7 पिढीपासून आहे.सावित्री देवी यांच्या कृपेने सिद्धेश्वर देवाचे आगमन झाले. 1967 यावर्षी जीर्णोद्धार झाला. ज्या ठिकाणी सिद्धेश्वर गुप्त झाले त्या ठिकाणी गावकरी सुद्धा येऊन राहिले अशी कथा सांगितली जाते.पूर्वी दूधगंगा नदीकाठी गाव होते. देवामुळे गाव देवळाजवळ आले. या देवाची प्रचिती अनेक भाविक भक्तांना आलेली आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी देवाचे तिसरे अश्व याचे निधन झाले. नुकतेच 4 थे देवाचे अश्व याचे आगमन. सर्वप्रथम अश्व गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये असंख्य महिला यांच्या घागरीमध्ये आंबील चा नैवेद्य होता. ढोल, ताशा, यांच्या गजरात गाव दुमदुमून गेले.फटाक्यांचे आकाशबाजी की मुख्य ठरली. मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावकरी मोठ्या उत्साहाने सामील होते. सिद्धेश्वर देवाचे घोंगडे पूजन करण्यात आले. देवाची पानाची पूजा भव्य दिव्य करण्यात आली.सरकार विजीतसिंह शिंदे यांनी भंडारा उधळल्यावर पुजारी यांना सर्वप्रथम महाप्रसादाचा मान दिला जातो. देवाचे वैशिष्ट्य मुसलमान समाज सुद्धा या देवाला येतात व देवाचा भंडारा देखील लावतात. दर रविवरी देवळामध्ये फार मोठी गर्दी असते. रविवार हा देवाचा मुख्य दिवस मानला जातो. अमावस्याला दूर दूर वरून भाविक भक्त येत असतात. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील 5/6 गावातील भाविक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. श्रावण महिन्यातील दशमीला या देवाचा वाढदिवस असतो. हा वाढदिवस 1996 पासून वाढदिवसा ची सुरुवात करण्यात आली. वाढदिवसाला संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो.यात्रेच्या वेळेला 3 दिवस महाप्रसादाचे भक्तांना आयोजन केले जाते.
यावेळी सरकार विजितसिंह शिंदे, विद्यमान सरपंच साहेबराव साबळे, विवेक भांगे, माजी सरपंच बाबासो पुजारी, यात्रा कमिटी सदस्य,समस्त गावकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments