कुरुंदवाड /गीता संघर्ष वृत्तसेवा।
कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक 1012/1 यांच्या शेतालगत अनोळखी मोटारीत ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर अंदाजे 40 वर्षीय व्यक्तिचा निर्घृणपणे खून केल्याचे आज उघडकीस आले मृताची ओळख पठविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने कोणीतरी पेट्रोल संपले म्हणून गाडी लावून गेली असावी असे समजून कोणाचेही लक्ष नव्हते. पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती. 12 वाजण्याच्या सुमारास लगतच्या शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली.
सपोनि रविराज फडणीस आपल्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उप अधीक्षक समीर साळवे यांना माहिती दिली आहे व पुढील तपासाची चक्री गतिमान झाली आहेत. खून झालेल्या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि तपासाची अन्य पथके पाचारण करण्यात आली आहेत.



0 Comments