Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

डीकेटीईचे स्नेहसंमेलन शिवशक्ती २०२४ -पारंपारिक दिनानिमित्त शिवरायांना मानवंदना

 इचलकरंजी / गीता संघर्ष वृत्तसेवा। 

डीकेटीईमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘शिवशक्ती २०२४’ सांस्कृतिक कार्यक्रमची सुरवात आज पारंपारिक दिनाने झाली. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्टये म्हणजे शिवराज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभुषेचे सादरीकरण करण्यात आले होते. डीकेटीईमध्ये उभारण्यात आलेला राज्यभिषेक सोहळयाचा देखावा, आयोध्या येथील राममंदीराची प्रतिकृती व छायाचित्रे विद्यार्थ्यांनी डीकेटीईच्या प्रांगणात उभी केली होती. महाराष्ट्रीय परंपरचे दर्शन घडवून नव्या पिढीने ट्रॅडीशनल डे ला शिवकालीन व पारंपारिक वेषभूषा परिधान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेले या मातीसाठी लढलेले तानाजी मालुसरे यांच्या १३ व्या पिढीतील वंशज डॉ सौ. शितल मालुसरे व विदेशातील जर्मन तज्ञ एंटोनिएस वॅन लायर या दोन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित ट्रॅडिशनल डे अतिशय उत्साहात साजरा झाला. 

यावेळी सेक्रेटरी डॉ.सौ.सपना आवाडे, डायरेक्टर डॉ. एल.एस.आडमुठे, सोशल डीन प्रा.सचिन कानिटकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.ए.व्ही. शहा, प्रा.व्ही.आर.बलवान, प्रा.ए.यु. अवसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डीकेटीईच्या ट्रडीशनल डे ची जर्मन तज्ञ एंटोनिएस वॅन लायर यांनी नोंद घेतली आहे. डीकेटीईमध्ये महिना भरासाठी हे जर्मन तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. ते स्वत: फेटा परिधान करीत या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांच्यासोबत सहभागी झाले. विद्यार्थी आणि डीकेटीईतील उत्साही वातावरण पाहून ते प्रभावी झाले व म्हणाले की, येथील विद्यार्थ्यााना त्यांच्या संस्कृतीबददल जाण आहे हे विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये यशस्वी होतील.


श्रीराम, लक्ष्मण, सीता, शिवाजी महाराज, मावळे, संत, सैनिक, इ. वेशभुषेत विद्यार्थी उपस्थित होते. त्यानिमित्त राजवाडयात आज अनेक शिवकालीन प्रसंग जिवंत झाले व सर्व वातावरण प्रभू श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता की जय, आदि घोषणांनी भारावून गेले होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...