पालकांच्या परवानगीने निर्मल नशामुक्ती केंद्रात रवानगी करणार:सपोनी फडणीस
कुरूंदवाड /गीता संघर्ष वृत्तसेवा।
कुरुंदवाड परिसरात गांजाचा दम मारणाऱ्या २२ नशेखोरांना कुरुंदवाड पोलिसांनी दणका देत. न्यायालयात उभे केले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांची पिढी बरबाद होत असल्याने पोलीस प्रशासनाने गांजा तस्करी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम हाती घेतल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
कुरुंदवाड शहर व परिसरात गांजाचा ओढणाऱ्या २२ नशेखोरावर गुन्हे दाखल करून त्यांना येथील न्यायालयात उभे केले. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन केले प्रकरणी त्यांच्यावर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेत काही अल्पवयीन मुले गांजाचा नशा करत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलवून याबाबत माहिती दिली आणि मुलांच्यावर लक्ष ठेवण्याबाबतच्या सूचना करून सोडून दिले.
अल्पवयीन आणि शाळकरी मुले देखील गांजाच्या आहारी जात असल्याने गांजाचा समूळ नष्ट करण्यासाठी शहरात पथके तैनात केली आहेत. प्रथमदर्शी सांगली, मिरज, इचलकरंजी, कर्नाटक राज्यातील अथणी, कागवाड, दत्तवाड येथून गांजाची कुरुंदवाडात तस्करी होत असल्याचे पुढे आले आहे. गांजासह अमली पदार्थाची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे.



0 Comments