येथील पालिका चौकात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज रंगे पाटलांचा विजय असो एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ही रॅली पुन्हा पालिका चौकात आल्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे गेल्या चार दशकापासून लढा सुरू होता. मराठा समाजाला कुणबी म्हटलं जातं कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकरी जसा शेतामध्ये उसाची लावण करून 13 महिने त्याची मशागत करतो आणि त्याचे पीक मिळते तसं मराठा समाजाने चाळीस वर्षे हे आरक्षण मिळण्यासाठी मशागत करत संघर्ष केला आणि आज मराठा समाज कुणबी असल्याचे सिद्ध झाले आणि आज हे यश पदरात पडल्याचे सांगितले.
यावेळी गोपाळ चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, बबलू पवार, विजय पाटील, महिपती बाबर, वैशाली जुगळे, अक्षय आलासे, आदींनी भाषणे केली. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दयानंद मालवेकर यांनी टीळा लावणार नाही असा तर महीपती बाबर यांनी नवीन कपडे परिधान करणार नाही असा पन केला होता.
आरक्षण मिळाल्याने त्यानी पन सोडले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पालिका चौकात उपोषण केलेल्या उपोषण कर्त्यांना माजी नगराध्यक्ष अक्षय यालासे यांनी साखर पेढे भरवून आणि सकल मराठा समाज बांधवांनी एकमेकांना साखर पेढे भरून सकल मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.



0 Comments