सोन्यांचे दागिने पॉलीस करून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांच्या टोळीने फसवणूक केली होती. रत्नागिरी पोलीसांनी तपास करून त्यांना अटक केली. रत्नागिरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोहमंद सुबेर इम्रान शेख (वय२८ रा.तुलसीपूर,बिहार) या संशयीताचा कोठडीत मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गुरुवारी सकाळी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आणला होता.
पोलीसांनी केलेल्या मारहाणीत मोहमंद याचा मृत्यू झाला आहे, असा आरोपी नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत संशयीत पोलीसांवर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे सीपीआर रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. लक्ष्मीपुरीसह पोलीसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी जमा झाला होता.
पोलीसांनी नातेवाईकांची समजूत काढली. मात्र ते ऐकत नव्हते, दुपारी एक वाजेपर्यत हा गोंधळ सुरू होता. शेवटी मृतदेह घेऊन नातेवाईक निघून गेले. मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.



0 Comments