Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

येथे ठरला शिक्षक दिन काळा दिन

 वतमाळ /गीता संघर्ष वृत्तसेवा। 

शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जाणारा शिक्षक दिन यंदा आंदोलनांचा दिवस ठरला. शासनाच्या शिक्षक विरोधी भूमिकांचा कडवा विरोध करीत जवळपास सर्वच शिक्षक संघटनांनी मंगळवारी आंदोलने केली.

सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामाची सक्ती करण्यात येत आहे. शासनाच्या या सक्तीच्या, अशैक्षणिक कामाच्या निषेधार्थ रोष व्यक्त करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी घोषित केल्याप्रमाणे सामूहिक रजा आंदोलन केले. समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, कार्याध्यक्ष रवींद्र उमाटे, जिल्हा शिक्षक नेते ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर आदींच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेपुढे येऊन नारे देण्यात आले.
त्याचवेळी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या (२३५) वतीने शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.

या आंदोलनात कार्याध्यक्ष आसाराम चव्हाण, शशिकांत खडसे, गजानन मडावी, सतीश मुस्कंदे, संजय फाळके, श्रीराम जिड्डेवार, अजय अक्कलवार, प्रवीण कापर्तीवार, मनीष नाकतोडे, गणेश चव्हाण, संजय वनकर, दिलीप हातगावकर, सचिन इंगोले, सुरेश भितकर, अनुप कोवे, कुशल समरित, विलास राठोड, प्रवीण जाधव, गजानन क्षीरसागर, सुभाष चव्हाण, हितेश राठोड, समरित, रंजना पाळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने निषेध आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिक्षक दिनी 'आम्हाला फक्त शिकवू द्या' अशी हाक देत काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी जिल्हा परिषदेसह ठिकठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक नेते मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठलदास आरू, राज्य उपाध्यक्ष सुभाष धवसे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...