मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समजाचं जातप्रमाणपत्र द्या, अशी मागणी प्रमुख आंदोलक मनोज जरांडे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान सहा राज्यांमधल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. भाजप आणि इंडिया आघाडी यांच्यापैकी यश कुणाला ? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुतूपल्ली , त्रिपुरातील बॉक्स नगर , धनपूर उत्तराखंड मधील बागेश्वर , उत्तर प्रदेशातील घोसी आणि पश्चिम बंगाल मधल्या धूपगुरी या जागांवर आज मतदान होईल.



0 Comments