Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

श्री दत्त पाॅलिटेक्निकमध्ये झाडांना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी

शिरोळ /गीता संघर्ष वृत्तसेवा। 

 श्री दत्त पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये विद्यार्थीनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. 

       रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून सण साजरा केला जात आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आपल्या जीवनातील वृक्षांचे महत्त्व वर्णन केले आहे. त्याप्रमाणे पर्यावरण रक्षण करणारे, मानवास अखंडित व मोफत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या झाडांना सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.


     याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य पी. आर. पाटील, उपप्राचार्य एन. बी. भोळे, मिस पी. बी. पाटील, विभाग प्रमुख ए. ई. पाटील, एस. पी. चव्हाण प्रा. ए. टी. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...