मुंबई /गीता संघर्ष वृत्तसेवा।
जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर २९ ऑगस्टला फैसला होणार आहे.
या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले असून, आपण निर्दोष असल्याचा दावा करीत किशोरी पेडणेकर यांनी ॲड. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्यापुढे गुरुवारी सुनावणी झाली.



0 Comments