खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि,हुपरी यांच्यावतीने शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे सभासद व शेतकरी वर्गासाठी हितगुज दौरा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा करण्यात आली
तसेच महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त डॉक्टर सौ गीता पाखरे व पार्वती लोहार यांचा सत्कारही राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक संजय कुमार कोथळी, संचालक सुकुमार किनिंगे, विजय कुंभोजे, नाना पाटील, बबन मुरगुंडे, केतन रायनाडे, अरुण ऐनापुरे, शहेनशहा जमादार, सुरेश यड्रावे, रावसो रायनाडे, कुलदीप कदम , आप्पासो सुंके, रमेश खोत, आप्पासो कुरुंदवाडे, विजय रायनाडे, भीमराव कुलकर्णी, हर्षद सांगावे आदी शेतकरी उपस्थित होते.




0 Comments