Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

कोण आहेत या डॉ. स्वाती पाटील जिच्या सोईसाठी प्रशासन लाळ घोटतंय.

 कोण आहेत या डॉ. स्वाती पाटील - जिच्या सोईसाठी प्रशासन लाळ घोटतंय.                                                              डॉ. स्वाती पाटील यांची दत्तवाड येथे पदस्थापणा असतानाही एकही दिवस दत्तवाड येथे सेवा न बजावता तिला डेप्युटेशन वर दोन दोन वर्षे तिच्याच गावी कोणतेही कारण नसताना गडहिंग्लज येथे ठेवले जाते व तिच्या सोईसाठी इतर डॉक्टरांची सेवा वर्ग करून त्या डॉक्टरांना नाहक त्रास दिला जातो. अखेर सीपीआरचे प्रशासन व आरोग्य विभागाचे  डेप्युटी डायरेक्टर प्रशासकीय कार्यालय तिच्यासमोर लाळ का घोटतंय हेच समजत नाही.  जर डॉ. स्वाती पाटील यांना पदस्थापणेच्या ठिकाणी नोकरीच करायची नसेल तर अशा डॉक्टरांना प्रशासन पोसतंय का आणि कशासाठी? डॉ. स्वाती पाटील यांना सेवामुक्त करा. अन  त्यांना कायमचे घरीच बसवा अशी मागणी आता दत्तवाड परिसरातून होत आहे. 


   
दत्तवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा। येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. गावात सरकारी सुविधा असतानाही नाइलाजास्तव रुग्णांना खासगीत उपचार घेण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांतून होत असून ढिम्म प्रशासन कधी शुध्दीवर येणार अशा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.  

दत्तवाड व परिसरातील गावांसाठी राज्य शासनाने ग्रामीण रुग्णालय सुरू केले. चांगल्या आणि दर्जेदार रुग्णसेवा गावातच उपलब्ध झाल्याने नागरिकांची चांगलीच सोय झाली. परंतु अलिकडच्या काळात येथील कारभार पाहता रोगापेक्षा झालज भयंकर अशी अवस्था रुग्णालयाची झाली आहे. सुसज्ज, इमारत, अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. पण त्या हातळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, आवश्यक कर्मचारी नसल्यामुळे सध्या येथे उपलब्ध असलेल्या साधनांवर धूळ चढली आहे.

दत्तवाड रुग्णालयासाठी १ वैद्यकीय अधीक्षक व ३ वैद्यकीय अधिकारी अशा चारही पोस्ट भरलेल्या असताना देखील सध्या एकही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाहीत. रुग्णालयीन कामकाज तसेच इमर्जन्सी सेवा या गोष्टी गेल्या सोमवारपासून वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्नेहल व्हटकर जाधव या सध्या एकट्याच सांभाळत आहेत. रुग्णालयामधील डॉ. स्वाती पाटील यांची पदस्थापना ग्रामीण रुग्णालयात असतानाही त्या येथे कार्यरत नाहीत. दत्तवाडचे असून, इथे वैद्यकीय अधिकारी कोणीही नसल्याने सध्या अधिकाऱ्यांची कमतरता इथे भासत आहे. डॉ. पाटील हे आता त्या उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे कार्यभार सांभाळत आहेत. व तसेच डॉ. पुजारी हे कोणतीही पूर्वकल्पना न देता २० फेब्रुवारीपासून कार्यरत नसल्याने दैनंदिन ग्रामीण रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त असलेली जागा त्वरित भरावी अशी रुग्ण कल्याणचे सदस्य आदिनाथ हिमगिरे व बाबुराव पोवार यांच्यासह दत्तवाड व पंचक्रोशीतील नागरिकांतून मागणी होत आहे. 


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...